Views


*केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आणल्या आहेत, तरी याचा लाभ ग्रामीण भागातील महिलांनी घ्यावा -- भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदेे* 

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यांचा लाभ ग्रामीण भागातील महिलांनी अधिकाधिक प्रमाणात घेतला पाहिजे, असे प्रतिपादन भाजपा तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांनी केले. उमरगा तालुक्यातील बाभळसुर येथे भाजपा महिला मोर्चा शाखेचे उद्घाटन भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन तालुकाध्यक्ष शिंदे बोलत होते. यावेळी प्रमुख म्हणून यावेळी प्रमुख म्हणून भाजपच्या महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सुलोचना अशोकराव वेदपाठक, तालुका उपाध्यक्ष ज्योती जयवंत कुलकर्णी, निर्मला सोनटक्के, आदि, उपस्थित होत्या. यावेळी पुढे बोलताना तालुकाध्यक्ष कैलास शिंदे म्हणाले की, महिलांनी चूल व मूल यातच मर्यादित न राहता त्यांनी वेगवेगळ्या उद्योगात पुढाकार घेऊन समृद्ध भारताचे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चात सहभागी व्हावे, असे सांगितले. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटटणीस माधव पवार मार्गदर्शन करताना म्हणाले की, गाव खेड्यातील महिलांना अधिकाधिक स्वावलंबी बनवण्यासाठी भाजप कटिबद्ध असून तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर येणाऱ्या विविध अडीअडचणी सोडवण्यासाठी भाजपचे सर्वच पदाधिकारी मदत करतील, केंद्र सरकारच्या विविध योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी सर्व महिलांनी पुढे येण्याची गरज आहे, असे मत व्यक्त केले. यावेळी बाभळसुर येथील महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून सुरेखा सुधाकर सूर्यवंशी, उपाध्यक्ष म्हणून रुक्मिणी दत्तू कांबळे, प्रगती काकासाहेब पाटील यांची सचिव तर वनिता संतोष हांडे यांची सह सचिव म्हणून निवड करण्यात आली. यावेळी प्रभावती घंटे, अनुसया सूर्यवंशी, जयश्री सुर्यवंशी, लक्ष्मी घंटे, सखू पाटील यांसह मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप मीडिया सेल तालुकाध्यक्ष जयवंत कुलकर्णी यांनी केले तर आभार तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रदीप सांगवे व अजय वेदपाठक यांनी मानले. या कार्यक्रमास भाजपाच्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
 
Top