Views


*मनसे लोहारा तालुका संघटकपदी अजय पवार यांची निवड*


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे नेते आ. राजु पाटील,अभिजीत पानसे, उस्मानाबाद जिल्हा संपर्क नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुक्यातील नागुर येथील अजय पवार यांची मनसे लोहारा तालुका संघटक पदी निवड करण्यात आली. अजय पवार यांना मनसे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या जळकोट येथील संपर्क कार्यालयात निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंके, लोहारा तालुका अध्यक्ष अतुल जाधव, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब रवळे, उपस्थित होते.

 
Top