*मोघा (बु) व मोघा (खुर्द) येथील जि.प.प्रा. शाळेस क्रिडा साहीत्याचे वाटप*
उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुक्यातील मोघा (बु) व मोघा (खु) ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा (बु) व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोघा (खुर्द) या शाळांसाठी मुलांचा शारीरिक विकास व्हावा, विद्यार्थी सशक्त, निरोगी राहावेत, वेगवेगळ्या खेळाची माहीती होऊन ग्रामीण भागातील विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून चमकावेत. त्यांचा बौद्धीक, मानसिक, शारीरीक विकास व्हावा यासाठी 14 व्या वित्त आयोगातुन दर्जेदार क्रिडा साहीत्य देण्यात आले. यामध्ये क्रिडा साहित्यात क्रिकेट, कॅरम, बुद्धीबळ, बॅडमिंटन, दोरी, लगोरी, फुटबॉल, डंबेल्स, घुंगरूकाठी, रींग, रनिंग सीडी, लेझीम या क्रिडासाहित्यासोबतच वजनकाटा, ढोल आदींचा समावेश आहे. यावेळी प्रथम दि. 2 ऑक्टोबर 2020 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन शिक्षणप्रेमी नागरीक श्रीकांत पाटील व ग्रामसेवक डी.पी.पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यापुर्वीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दोन्ही शाळांना एलईडी संच, साऊंड सिस्टीम, टेबल, वाचनालयासाठी रॅक हे साहीत्य प्राप्त झाले आहे. 14 व्या वित्त आयोग जिल्हा परीषदेच्या शाळा सुधारणेसाठी वरदान ठरत आहे. यामुळे शाळेच्या भौतिक गरजा पुर्ण होण्यास मदत होत आहे. गावकऱ्यांनीही शाळेच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, असे मत मुख्याध्यापक विकास घोडके यांनी मांडले. यावेळी ग्रामसेवक डी.पी.पवार ज्येष्ठ नागरिक शिवाजी जाधव, मुख्याध्यापक लिंबराज बनकर, योगेश गोरे, आदी उपस्थित होते.