Views




पुढील हंगामातबियाणे तुटवडा जाणवणार असल्याने शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावेत -- कृषी विशेषज्ञ पांचाळ यांचे शेतकऱ्यांना आवाहन  केसरजवळगा येथे पोक्रा योजनेअंतर्गत शेतीशाळा 


उस्मानाबाद :-(इकबाल मुल्ला)

परतीच्या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचे मोठयाप्रमाणात नुकसान झाले आहे. जवळपास ७०% बियाणे डॅमेज झाले आहेत त्यामुळे पुढील वर्षी बियाणांचा तुटवडा निर्माण होऊ शकते यासाठी शेतकऱ्यांनी न भिजलेले सोयाबीन, उडीद, मूगाचे बियाणे खरेदी करून घरीच बीज प्रक्रिया करून ठेवावी तसेच पेरणीपूर्वी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, असा सल्ला कृषी विशेषज्ञ सचिन पांचाळ यांनी दिला. उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत शेतकऱ्यांसाठी शेती शाळाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पांचाळ यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी उमेश बिराजदार तसेच प्रकल्प सहाययक तानाजी हिप्परकर, मुक्ताजी कांबळे, आदर्श समन्वयक दत्तात्रय नागरगोजे, अजिंक्य पाटील, प्रमुख प्रशिक्षक संपदा डोंगरे, विकास कांबळे, सुलक्षणा गोडसे, समूह सहायक संतोष बांगर, कृषी सहायक के.पी.सुतार, बी.एस.खंडाळकर त्याचप्रमाणे सरपंच बलभीम पटवारी,उपसरपंच गुरबस भुरे,तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर कनमुसे, जयपालसिंग राजपूत, उमेदचे राठोड उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्यावतीने आयोजकांचे आभार मानले.
 
Top