Views


भाजपा नेते स्वर्गीय प.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करावे -- भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भारतीय जनता पार्टीच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ता व पदाधिकारीकार्यांना कळविण्यात येते की, दिनांक 25 सप्टेंबर रोजी भाजपा नेते स्वर्गीय प दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपा प्रदेश सरचिटणीस  आ. सुजितसिंहजी ठाकुर साहेब व तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. राणाजगजितसिंहजी पाटिल यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली खालील कार्यक्रमांचे क्रमशः आयोजन करावे
1) प्रत्येक बुथवर पंडितजींच्या प्रतिमेचे पूजन हार घालणे,
2)बूथप्रमुखा व कार्यकर्त्याने घरावर भाजपाचा ध्वज लावणे त्याचप्रमाणे जिल्ह्यात  विधानसभाशः पंडितजींच्या जीवनावर माहिती प्रबोधनात्मक मार्गदर्शन इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहाने पंडितजींची जयंती साजरी करण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष  नितीनजी काळे यांनी केले आहे.

 
Top