Views
भाजपा नेते स्वर्गीय प.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुका भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रम संपन्न


उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंहजी ठाकुर व तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आ. राणाजगजितसिंहजी पाटिल, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, बुध्दीजीवी प्रकोष्ठ प्रदेश संयोजक तथा भाजप माजी जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोहारा तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहरात व तालुक्यात दिनांक 25 सप्टेंबर रोजी भाजपा नेते स्वर्गीय प.दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. लोहारा शहरात भाजपाच्या वतीने भाजपा नेते स्वर्गीय प.दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, तालुका सरचिटणीस नेताजी शिंदे, नगरसेवक आयुब अब्दुल शेख, मिडिया तालुकाध्यक्ष इकबाल मुल्ला, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी चव्हाण, जिल्हा कार्यकारणी सदस्य कमलाकर सिरसाठ, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडू तिगाडे, विजय महानुर, राजशेखर माणिकशेट्टी, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष बाबा सुंबेकर, यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.

 
Top