Views


लोहारा तालुक्याचे उप अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी आय.एल.कोळी यांचा सेवामुक्त झाल्याने सत्कार

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
लोहारा तालुक्याचे उप अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी आय .एल.कोळी (माने) सेवामुक्त झाल्याने यांचा हाजी शब्बीर अहेमद अन्सारी बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेबुब फकीर, सदस्य युसुफ कुरेशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोहारा तालुका उपअधीक्षक कार्यालय येथे 2012 रुजू झाले होते. गेले आठ वर्षापासून ते लोहारा तालुक्यातील जनतेला निस्वार्थ विनातक्रार सेवा दिली गेल्या आठ वर्षात यांच्याविरुद्ध एक ही जनतेची तक्रार नसून कार्यक्षम अधिकारी असून यांच्या कार्यकाळात जनतेचे अनेक प्रलंबित प्रकरणे संपूर्ण स्वतःहून निकाली काढून प्रामाणिकपणे जनतेला न्याय देण्याचा  काम केल्याने तालुक्यातून त्यांचा अभिनंदन करण्यात आला आहे. यावेळी सद्दाम मुलानी, ताहेर फकीर, सरफराज फकीर , आफताब कुरेशी आदि उपस्थित होते.
 
Top