Views


शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक पांडुरंग लाड यांच्यावतीने बेंबळी पोलीस स्टेशनला कॉम्प्युटर संच भेट

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात मोलाचे योगदान असलेल्या बेंबळी पोलीस स्टेशनला कॉम्प्युटर CPU संच रुईभर चे शिवसैनिक पांडुरंग लाड यांच्यातर्फे बेंबळी पोलीस स्टेशनला सुपूर्द करण्यात आले. यावेळी बेंबळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मुस्तफा शेख ,बिट अंमलदार बारगजे, शिवसेनेचे विभाग प्रमुख दीपक पाटील, गौसभाई पठाण, श्याम सुंदर पाटील, स्वप्निल कुलकर्णी, समाज सेवक गालीब काका पठाण, पत्रकार अमर कटके, नितीन खापरे पाटील, उपस्थित होते.

 
Top