Views


संत काशिबा महाराज चौकाचा लोकार्पण सोहळा संपन्न

 उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
उस्मानाबाद येथील एमआयडीसी चौक व उड्डाणपूलाला संत काशिबा महाराज नामकरण करण्याचा ठराव नगरपालिकेने केला होता. त्या अनुषंगाने दि.3 ऑगस्ट रोजी संत काशिबा महाराज नामफलकाचे अनावरण आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते व लोकार्पण खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या हास्ते करण्यात आले. या प्रसंगी जि.प.अध्यक्ष अस्मिताताई कांबळे, आ.कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राजाभाऊ शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ पंडितराव नळेगावकर होते. याप्रसंगी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, उद्योजक बाळासाहेब क्षिरसागर, लघुउद्योग भारतीचे संतोष शेटे, प्रवीण काळे, संभुदेव खटिंग, बांधकाम सभापती तथा गटनेते युवराज नळे, शिवसेनेचे गटनेते सोमनाथ गुरव, नगरसेवक सिध्देश्वर कोळी, योगेश जाधव,अक्षय ढोबळे, सिध्दार्थ बनसोडे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे संस्थापक विष्णू इंगळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश राजेनिंबाळकर, तुषार निंबाळकर, देवानंद येडके, बापू शेळके, लक्ष्मण माने, रंगनाथ गुरव, प्रीतम मुंडे , संदीप इंगळे यांची उपस्थिती होती. यावेळी अॅड.पंडितराव नळेगावकर, भालचंद्र धारुरकर, गोपाळ नळेगावकर, श्रीनिवास पाटील, प्रभाकर कदम, मोहन पाटील, अॅड.प्रशांत खंडाळकर, डॉ.महेश गुरव, सुनील तिर्थकर, महेश मोटे, प्रमोद बचाटे, सचीन धारुरकर, अॅड.अतुल पाटील यांनी सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रदिप मोकाशे यांनी तर आभार  केशव पाटील यांनी मानले.

 
Top