Views


निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळच्या सल्लागारपदी दत्ताजी जावळे - पाटील

लोहारा:-( इकबाल मुल्ला)
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र या संस्थेच्या राज्य सल्लागारपदी लोहारा येथील वसंतदादा पाटील हायस्कूलचे सह शिक्षक दत्ताजी जावळे - पाटील यांची निवड झाली आहे. निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थेचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी शिक्षक दत्ताजी जावळे - पाटील यांनी केलेल्या पर्यावरण सरंक्षण, संवर्धन व इतर विविध क्षेत्रातील केलेल्या कार्याची दखल घेत संस्थेच्या राज्य सल्लागारपदी निवड केली आहे. वसंतदादा पाटील हायस्कूल मध्ये शालेय विद्यार्थिनाच्या प्रश्नावर निसर्ग संवर्धनासाठी केलेल्या मार्गदर्शन, उपाय योजना, निसर्ग प्रदूषण रोखण्यासाठी करावयाचे उपाय योजना, निसर्ग संवर्धन नाही केले तर भविष्यात होणाऱ्या निसर्गाच्या हानीचे दुष्परिणाम याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. संवर्धनासाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली. या निवडीचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण चव्हाण, यांच्यासह सर्व शिक्षक बांधव, मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top