माध्यमिक स्तरावर मिळवलेली गुणवत्ता हि आयूष्यातली कायमची असते. उर्वरित यशासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे असे आवाहन स. पोलिस उपनिरिक्षक राजेश आर . गडवे यांनी गुणवंतांसाठी केले.
भूम:-(आसिफ जमादार)
माध्यमिक स्तरावर मिळवलेली गुणवत्ता हि आयूष्यातली कायमची असते. उर्वरित यशासाठी प्रयत्नात सातत्य ठेवावे असे आवाहन स. पोलिस उपनिरिक्षक राजेश आर . गडवे यांनी गुणवंतांसाठी केले . रविवार दि २ ऑगष्ट रोजी भूम येथे कोरोना डिस्टन्सचे नियम पाळत माध्यमिक परिक्षेतील मोजक्या ४ गुणवंतांचा सत्कार बहूजन नायक ग्रूपच्यावतीने करण्यात आला . कार्यक्रमासाठी पोलिस उपनिरीक्षक आर आर गडवे,ॲड बाळासाहेब सुकाळे, मिलिंद कांबळे, रामदास गायकवाड, दिपक वाळके,पञकार शंकर खामकर, भिमराव नागटिळक,समाजरत्न रविंद्र लोमटे आदींची उपस्थिती होती .
यावेळी प्रतिक सुनील डोके सर्वच विषयात १०० टक्के, प्राजक्ता संतोष शिंदे ९५.८० टक्के, विपस्सी बाळासाहेब सुकाळे ९५.४० टक्के,गौरव मिलिंद कांबळे ९२.०० टक्के या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.