Views


न उगवलेल्या बियाण्याचे राज्यसरकाने लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी -- मनसे तालुकाध्यक्ष अतुल जाधव


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
न उगवलेल्या बियाण्याचे राज्यसरकाने लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशा मागणीचे निवेदन लोहारा मनसे तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, लोहारा तालुक्यात एकुन 405 हेक्टरवरील सोयाबीनचे बियाणे उगवलेले नाही. त्यातुन महाबीज कंपनीचे 255 हेक्टर तर इतर खाजगी कंपनीचे 150 हेक्टर वरील सोयाबीन न उगवल्यामुळे शेतकऱ्याला याचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत लोहारा कृषि विभागाकडे तब्बल 413 अर्ज दाखल झाले आहेत. परंतु कोरोणासारख्या महाभयंकर रोगामुळे लागु असलेल्या लोँकडाउनच्या विळख्यात सापडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधीकारी व गटविकास अधिकारी यांना अर्ज दिला आहे. या वर्षी शेतकऱ्यांना बोगस बियाण्यामुळे दुबार पेरणीचा मोठा फटका बसला असून कृषि विभागाने सोयाबीन बियाणे न उगवलेल्या क्षेत्राचा पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आला आहे. राज्य शासनाची भागीदारी असलेल्या महाबीज कंपणीचेही बियाणे उगवलेले नाहीत. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना ताबडतोब हेक्टरी 25 हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी. अनेक खासगी कंपन्यांचे बियाणे बोगस असल्याचे पंचनाम्यात नोंदवून कृषि विभागाने राज्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात या प्रकरणी सुनावणी सुरू होती परंतु खाजगी बियाणे कंपन्यांनी सर्वोच्य न्यायालयात धाव घेतल्यामुळे सर्वोच्य न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत बियाणे कंपन्यांवरील कारवाईला स्थगिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग आणखीन खडतर झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारची भागीदारी असलेल्या महाबीज या बियाणे महामंडळाच्या विरोधात 255 हेक्टरवर तक्रार आहे. त्यामुळे कृषी अहवालानुसार शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी किमान 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लोहारा तालुक्यात खळखट्याक आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष अतुल जाधव, विध्यार्थी सेना अध्यक्ष विवेक बनसोडे, तालुका उपाध्यक्ष दादासाहेब रवळे, तालुका उपाध्यक्ष सतीष बनसोडे, तालुका सचिव संदिप मोरे, अजय पवार, बालाजी गाडे, परमेश्वर कोकणे, अमोल सलगरे, हनुमंत सुर्यवंशी, श्रावण गरड, अदिंच्या सह्या आहेत.

 
Top