Views


कोरोनासह विषाणू तपासणी लॅब उस्मानाबाद येथे सुरू करण्यासाठी पुढाकार  घेतल्याबद्दल जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांचा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा दैनिक पुण्य नगरीचे वृत्तसंपादक धनंजय रणदिवे यांनी सत्कार केला

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
उस्मानाबाद येथे राज्यातील पहिल्या उस्मानाबाद येथे राज्यातील पहिल्या लोकसहभागातून उभारलेल्या कोरोना सह विविध विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि. 23 जुलै 2020 रोजी ऑनलाइन करण्यात आले. ही प्रयोगशाळा उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या परिसरात उभारण्यात आली आहे. जिल्ह्यातील उस्मानाबाद जनता सहकारी बँक, नॅचरल शुगर इंडस्ट्रीज, जिल्हा पतसंस्था फेडरेशन आदी विविध संस्था, बँका, पतसंस्था व दानशूर मंडळीच्या सहकार्यातून उभारण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ, कोविंड लॅबचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शिरीष यादव, जिल्हा नियोजन सहाय्यक अधिकारी सोमनाथ रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांच्या पुढाकार व प्रयत्नातून ही प्रयोगशाळा साकारले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सध्याच्या कोरोना महामारी सह भविष्यात देखील विविध रोगराई आजारांच्या तपासणीसाठी ही प्रयोगशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या प्रयोगशाळेची शिल्पकार जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, नोडल अधिकारी यादव, रेड्डी यांचा जिल्हा मराठी पत्रकार संघ व पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाच्या वतीने अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी सत्कार केला.
 
Top