Views


पारगाव येथील व्यक्तीचे पाच लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

 वाशी येथील पारगाव येथील निनावी फोन आल्यास बँकेचा ओटीपी नंबर देऊ नका, असे वारंवार सूचित करूनही  ग्राहक सजग होत नाहीत.त्याचा फटका एका ग्राहकास बसला असून, पाच लाखास गंडवण्यात आले आहे.
निखील सुहास पारगावकर, रा. पारगाव, ता. वाशी यांनी दि. 20.07.2020 रोजी ॲक्सीस बँक खात्यातील रक्कम महाराष्ट्र बँकेत असलेल्या त्यांच्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने स्थलांतरीत केली परंतु ती रक्कम झाली नाही. यावर त्यांनी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात फोनद्वारे संपर्क साधला.
थोड्या वेळाने एका अनोळखी मोबाईल वरुन त्यांना फोन आला. समोरील व्यक्तीने त्यांना एक ऑनलाईन अर्ज भरण्यास लिंक पाठवली. या लिंकवर त्यांनी आवश्क माहिती भरली यावर त्यांना ओटीपी आलेले 3 संदेश त्यांनी समोरील व्यक्तीस पाठवले. थोड्याच वेळात निखील परगावकर यांच्या ॲक्सीस बँक खात्यातून तीन व्यवहारात एकुण 5,00,000/-रु. ऑनलाईन पद्धतीने काढून घेण्यात आले. 
अशा मजकुराच्या निखील पारगावकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन संबंधीत मोबाईल क्रमांक धारकाविरुध्द भा.दं.सं.- 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (ए) (डी) अन्वये गुन्हा दि. 21.07.2020 रोजी नोंदवला आहे.

 
Top