Views


अमिष देवगण वर गुन्हा दाखल करावा व न्यूज 18 इंडिया चॅनल बंद करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे साकडे.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

  प्रसिद्ध सुफी संत हजरत  खाॅजा मोईनोद्दिन चिश्ती  गरीब नवाज रहेमतुल्लाह अलैह, अजमेर ( राजस्थान) यांच्याविषयी न्यूज 18 इंडिया चॅनल  टीव्ही डिबेट शो मध्ये अँकर अमिष देवगण याने अपशब्द उच्चारल्यामुळे त्यांना माणनाऱ्या देशातील  सर्व धर्मातील लोकांच्या भावना संतप्त झालेल्या आहेत अमिश देवगण वर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन देण्यात आले.
   मंगळवार दि.16 जून रोजी संध्याकाळी 07:30 न्यूज 18 इंडिया या चॅनल  वर अँकर अमिष देवगण हा आरपार या नावाने लाईव्ह डिबेट घेत असताना त्याने भारतातील प्रसिद्ध  सुफी संत हजरत खाॅजा मोईनोद्दीन चिश्ती गरीब नवाज रहेमतुल्लाह अलैह अजमेर शरीफ ( राजस्थान) यांच्याविषयी अपशब्द उच्चारले यामुळे त्यांना माणनाऱ्या सर्व धर्मातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून या अँकर अमिष देवगण वर तत्काळ गुन्हा दाखल करावा व न्यूज 18 इंडिया या चॅनल वर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी म्हणजे  टीव्ही डिबेट च्या नावाखाली समाजात दूही निर्माण करण्याचा जो प्रयत्न होत आहे त्याला आळा बसेल या मागण्याचे निवेदन उस्मानाबाद येथील  समस्त मशायक व मुस्लिम समाज यांच्या वतीने मा.मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्यामार्फत पाठविण्यात आले माहिती स्तव मा.प्रधानमंत्री जी यांनाही पाठविण्यात आले.

 
Top