Views


वाशी येथे बिजप्रक्रिया करून बी.बी.एफ. वर पेरणी 

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

     वाशी तालुक्यात पेरणीसाठी समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी राजा सुखावला असून पेरणी साठी लगभग करत आहे. कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली नैतिक अँग्रो प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन श्री नितीन घुले यांच्या शेतावर कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी मेळावा घेऊन प्रत्यक्ष पेरणी करण्यात आली .
     या वर्षी नैतिक अँग्रो प्रोड्यूसर कंपनीने कृषि विभागाच्या आवाहनास प्रतिसाद देत कंपनीच्या चेअरमन श्री नितीन घुले व इतर सदस्यांच्या शेतावर प्रत्यक्ष सोयाबीन बियाण्यास बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करून बी.बी.एफ द्वारे पेरणी करून प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी कृषि विभागाच्या बी.बी.एफ च्या फायद्याविषयी मंडळ कृषि अधिकारी श्री नितीन भांडवले,कृषि सहाय्यक श्री दिनेश लोंढे यांनी मार्गदर्शन केले बी.बी.एफ वर पेरणी केल्यामुळे पावसात खंड पडल्यास वरंब्यावर ओलावा टिकवून ठेवल्यामुळे पिकास पाण्याचा तान पडत नाही तसेच जास्तीचे पाणी झाल्यास सरीद्वारे पाण्याचा निचरा होतो, मुबलक हवा व सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होते व पीक कीड रोगास बळी पडत नाही,पिकाची अंतरमशागत , औषध फवारणी साथी ही पद्धत फायदेशीर ठरते , पेरणीसाठी बियाणे कमी लागते,पाण्याची बचत होते, एकूणच कमी खर्चात उत्पन्नामद्धे हमखास वाढ होते. त्यामुळे बी.बी.एफ ही पद्धत प्रभावी व फायदेशीर असल्याने शेतकऱ्यांनी  याचा जास्तीत जास्त अवलंब करावा असे आवाहन कृषिविभाग व नैतिक अँग्रो प्रोड्यूसर कंपनी यांच्या वतीने करण्यात आले यावेळी नैतिक अँग्रो प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन श्री नितीन घुले, मंडळ कृषि अधिकारी श्री नितीन भांडवले, कृषि पर्यवेक्षक श्री रामदास शिंदे, कृषिसहाय्यक श्री दिनेश लोंढे,कृषि मित्र श्री अंगद चोथवे, कंपनीचे सदस्य श्री. भरत घुले, श्री.विलास घुले,श्री. हेमंत कवडे,श्री. बिपीन घुले, श्री. सुनील रसाळ, श्री संग्राम नन्नवरे,किरण घुले, सह मोठ्या प्रमानात शेतकरी उपस्थित होते.

 
Top