*मुख्यमंत्र्याची घोषणा हवेतच, राज्य परिवहन महामंडळाला सहा महिन्यानंतरही आदेश प्राप्त नाहीत ,आस्थापनधारकांची अडचण !भाडे माफीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.*
कळंब /प्रतिनिधी
मुख्यमंत्र्याची घोषणा हवेतच, राज्य परिवहन महामंडळाला सहा महिण्या पूर्वी घेतलेल्या निर्णयाची सहा महिन्यानंतरही आदेश प्राप्त नाहीत ,आस्थापनधारकांची अडचण !भाडे माफीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने बस स्थानक मधील कोरोणा काळातील गाळ्यांचे भाडे माफ करण्याबाबत चा १८ नोंहबर 2022 चा बैठकी चा निर्णयाच्याअंमलबजावणी करण्याची मागणी आस्थापनाक धाराकातून होत आहे .या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आस्थापनाधारकांनी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या कडे सर्व स्थापना धारकांनी एका पत्राद्वारे मागणी केली आहे . या पत्रातम्हटले आहे की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाची ३०२ वी बैठक दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन- नैनोटिया, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चेन्ने, कामगार आयुक्त सुरेश जाधव, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांचेसह एसटी महामंडळ, परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.
या बैठकीत विविध विषयावर सखोल चर्चा होऊन आस्थापनाधारकांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे कोरोना काळातील व एसटी महामंडळाच्या संप काळातील अस्थापनाधारकाचे भाडे विविध टप्प्यांमध्ये माफ करण्याचा निर्णय जो मुख्यमंत्र्यांनी धाडसी वृत्तीने घेतला त्याचे समाधान आस्थापनाधारकातून व्यक्त होत आहे तर या निर्णयामुळे आस्थापना का धारकांना यापुढे चांगले दिवस येतील असेही बोलले जात आहे या बैठकीमध्येटाळेबंदी काळातील परवाना शुल्कात एसटी स्टॉल्सला सवलत .कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या काळात झालेल्या टाळेबंदीमुळे आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संप काळात बसस्थानकांवरील परवानाधारक वाणिज्य आस्थापनांना परवाना शुल्कात सवलत देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. टाळेबंदीच्या मार्च ते ऑगस्ट २०२० या काळासाठी १०० टक्के, एप्रिल ते जून २०२१ साठी ५० टक्के आणि नोव्हेंबर २१ ते एप्रिल २०२२ या संप कालावधीत परवाना शुल्कात ७५ टक्के सवलत देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. या सवलतीचा सुमारे ३२०० परवानाधारक याना लाभ मिळणार आहे . तर अपघातप्रवण जागांजवळील अतिक्रमणे काढा-राज्यातील एक हजारपेक्षा अधिक अपघातप्रवण जागा असून अपघात टाळण्यासाठी त्या भागात असलेले अतिक्रमणे काढण्याबरोबरच चालकांना स्पष्ट दिसतील असे फलक लावण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या होत्या . पण या वरील सर्व गोष्टींचा मात्र अद्याप एकही आदेश संबंधित कार्यालयाला मिळाला नाही त्यामुळे अनेक बंद झालेल्या आस्थापनांचा हिशोब बाकी आहे त्याचप्रमाणे या बंद काळातील आस्थापनाचे भाडे मागण्यासाठी एसटी महामंडळ वारंवार तगादा लावीत आहे तरी यावरील घेतलेल्या निर्णयाचा तात्काळ आदेश संबंधी विभागाला सूचना द्याव्यात अशी मागणी विलास मुळीक, दत्तात्रय उमाप , एम .जे .लोकरे , बी .एच .चोरघडे , अकिब पटेल, मुकीब पटेल , दिलीप चालक , सोमनाथ सुरवसे ,करीम पठाण , अंकुर चालक ,हरीश धमावत , प्रसाद करवलकर , विकास कदम आदी केली आहे .