Views


*डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त शहरात विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रम*

*पोलिस प्रशासनाचे चोख बंदोबस्त ठेवत वाहतूक व्यवस्था सुरळीत*

कळंब/प्रतिनिधी


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त शहरात विविध ठिकाणी भरगच्च कार्यक्रम घेऊन शुक्रवार (ता.१४) रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बालोद्यानातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यास अबिवडण करण्यासाठी अगदी सकाळ पासूनच गर्दी वाढत गेली. सामूहिक रित्या त्रिशरण,पंचशील घेऊन बुद्धवंदना, भीम वंदना घेण्यात येऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सतपाल बनसोडे, अमर गायकवाड, सुनील गायकवाड यांच्या विनंतीवरून समाजबांधवांनी अभिवादन करण्यास येताना प्रत्येकी एक वही व एक पेन आणण्यास सांगितले होते,त्यानुसार विनंतीचे पालन करण्यात आले. 

अहिल्याबाई होळकर चौक येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजानिक उत्सव समितीच्या वतीने पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन अजित पिंगळे, प्रा.संजय कांबळे, किशोर वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नितीन डाके, सचिन तिरकर, संदीप सावंत, धम्मम वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. 

इंदिरा नगर भागात तीन झेंडा चौकात, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन राजभाऊ टोपे, विनोद बचुटे, विकी टोपे, आनंद विद्यागर, किरण मोरे आदींची उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्याना वह्या व लेखणीचे वाटप परिसरातील विद्यार्थ्याना करण्यात आले. 

पुनर्वसन सावरगाव येथील बुद्ध विहरमध्ये सकाळी प्रा.बप्पा शिंदे, प्रा अनिल जगताप यांच्या हस्तेध्जारोहण करण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन बळीराम गायकवाड, विठल समुद्रे, जयराम वाघमारे आदींच्या हस्ते करण्यात आले. 

सायंकाळी इंदिरा नगर,कल्पना नगर, लायन्स कंपनी, लेजेंड ग्रुप क्या वतीने, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुका चे आयोजन करण्यात आले होते , मिरवणुका पाहण्यासाठी परिसरातून नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी मसाला दूध, खाऊ वाटप, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.हमाल मापाडी संघटना मार्केट यार्ड कळंब क्या वतीने अल्पोपहार ची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय शहरातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी कळंब पोलीस उपविभागीय अधिकारी सहाय्यक अधिक्षक एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुरेश साबळे , पोलीस उपनिरीक्षक रामहरी चाटे, वर्षा साबळे यांच्यासह पोलिस नाईक श्रीराम मयांदे, युवराज चेडे, सचिन गायकवाड, बालाजी शिंदे, विजय मानकुळे, आसाराम खाडे, अमोल जाधव, महादेव मुंडे, रवी कोरे, करीम शेख,सादेक शेख,खंडू माळवे,गणेश वाघमोडे, अमोल राऊत, अभिजित देशमुख, शिवाजी राऊत, महिला पोलिस नाईक प्रतिभा मते,रेखा काळे, आदींनी चोख बंदोबस्त करत वाहतूक व्यवस्थेचे चोख काम बजावले.  
Top