Views




*महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कामगार व कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपास उमरगा तालुका भाजपा महिला मोर्चा यांचा पाठिंबा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ राज्य शासनात विलिनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी एसटी कामगार व कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या संपास उमरगा तालुका भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.सुलोचनाताई वेदपाठक यांनी पाठिंबा देऊन अध्यक्ष कामगार युनियन संघटना सर्व कर्मचारी उमरगा यांना निवेदन दिले आहे. या 
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तातडीने राज्य शासनात विलिनीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील लाखो एसटी कर्मचारी दि.28/10/2021 च्या मध्यरात्री पासून संपावर गेले आहेत. यांची मागणी रास्त व कायदेशीर असून याबाबत एसटी कामगारात आक्रोश व उदासीनता असून अनेक एसटी कामगारांना आजतगायत तुटपुंज्या पगारी मुळे कर्जबाजारी होऊन उदरनिर्वाह न करता आल्यामुळे आर्थिक संकटाला कंटाळून आतापर्यंत महाराष्ट्रातील 29 कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागलेला आहे. तरी येथून पुढे त्यांना चांगली जीवन जगण्यासाठी एसटी कामगारांचे राज्य शासनात विलगीकरण झाली पाहिजे या रास्त मागणीस आमचा पूर्णतः पाठिंबा आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर भाजपा महिला मोर्चा उमरगा तालुका अध्यक्षा सौ सुलोचनाताई अशोक वेदपाठक, मीडिया सेल तालुका अध्यक्षा जयवंत कुलकर्णी, शाखा अध्यक्षा उषा गाडेकर, उपाध्यक्ष छाया एकीले, सरचिटणीस कोंडाबाई बेळे, चिटणीस शहनाज बागवान, सूरेखख पिटले, सविता एकीले, यांच्या सह्या आहेत.
 
Top