*परिवर्तन दिव्यांग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने दिव्यांग, वेडसर, मूकबधिर लोकांसोबत केली दिवाळी साजरी*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
उस्मानाबाद जिल्ह्यातील परिवर्तन दिव्यांग बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील बस स्थानक , जिल्हा परिषद, सेंटर बिल्डिंग, तुळजाभवानी शॉपिंग सेंटर परिसरात फिरणारे दिव्यांग, वेडसर, मूकबधिर व फुटपाथवर राहणारे नागरिकांना नवीन कपडे,महिलांना गाऊन, थंडीपासून बचाव करण्यासाठी चादर व फराळाचे वाटप करण्यात आले, ही संस्था मागील अनेक वर्षांपासून गोरगरिबांना मदत करते,लोकडाऊन च्या काळात ही यांनी अनेक गरजू कुटुंबाना अन्नधान्याची किट वाटप केले आहेत,
दिवाळीच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष सय्यद रसूल,सय्यद नासिर,महेबूब सय्यद,हैदर शेख, नसीम नजिर सय्यद, सुलतान सय्यद यांनी केलेले कार्य हे कौतुकास्पद असून त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.