Views


*फणेपुर येथे सेंद्रिय शेती निविष्ठा प्रात्येक्षिक कार्यशाळा संपन्न*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील फणेपुर येथे दि.12 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्‍प व परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत तुलसी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था व हिरकणी सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन व विक्री केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन कार्यशाळेचे संतोष रुईकर तहसीलदार लोहारा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. व तसेच सेंद्रिय शेती निविष्ठा उत्पादन गांडूळ खत युनिटचे प्रतिभा रामराव काळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सदर कार्यशाळेस हरकणी महिला शेतकरी समुहातील सदस्यांना घरगुती बियाणे वापरुण पेरणी करण्याचे व सेद्रिय निविष्ठा उपयोग करून पिक उत्पादन घेण्याचे तहसीलदार संतोष रुईकर यांनी आवाहन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी मिंलीद बिडबाग यांनी पंजाब राज्यात पिक उत्पादनात जास्त प्रमाणात रासायनिक निविष्ठा वापरल्याने होणारे आरोग्यावर दुष्परिणाम याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी हिरकणी महिला शेतकरी गटातील सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते सहभागिता हमी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. सदर प्रात्यक्षिक कार्यशाळेच्या माध्यमातून सेंद्रिय निविष्ठा दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, जीवामृत, वेस्ट डी कंपोजर, व्हर्मीवाँश व गांडुळ खत यांचे तयार कशा प्रकारे करावे व वापर कसा करावा माहीती देण्यात आली. यावेळी तालुका समन्वयक सेंद्रिय शेती नरेंद्र गवळी, कृषी पर्यवेक्षक रवी बनजगुळे, कृषी सहाय्यक जालिंदर माळी, तलाठी सचिन कांबळे, प्रभाग समन्वयक अविनाश चव्हाण, प्रभाग समन्वयक प्रदीप चव्हाण, कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर, कुषीसखी अनिता माळी, संस्थेचे कार्याध्यक्ष रामराव काळे, गोरख जाधव, आदि उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रभाग समन्वयक सेंद्रिय शेती शिवशंकर कांबळे यांनी केले तर संस्थेचे कार्याध्यक्ष रामराव काळे यांनी आभार मानले.
 
Top