Views*संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी व जिजाऊ ब्रिगेड तर्फे अहिल्याबामाई होळकर यांची पुण्यतिथी साजरी*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी निमित्त लोहारा शहरामध्ये संभाजी ब्रिगेड कामगार विभाग व जिजाऊ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करन्यात आली यावेळी प्रतिमेचे पूजन जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा रंजना ताई हासुरे व लोहारा पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हान यांच्या हस्ते करन्यात आले. या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचीव आशीष पाटील, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी चे लोहारा तालुकाध्यक्ष महेश गोरे, शहराध्यक्ष प्रशांत थोरात, जिजाऊब्रिगेडच्या कार्यध्यक्षा प्रतीभाताई परसे उपध्यक्षा शुभांगीताई चव्हान, कास्ती शाखा अध्यक्ष इंदुमती पाटील तसेच मराठा सेवा संघाचे माजी प्रदेशाध्यक्ष इंजिनीयर नेताजी गोरे साहेब, राष्ट्रवादीचे आप्पासाहेब देवकर, जालिंदर भाऊ कोकणे सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी, युवा सेना तालुका अध्यक्ष अमोल भैया बिराजदार माजी नगरसेवक अभिमान खराडे, विष्णू नारायणकर सुधीर घोडके ,डां.हेमंत श्रीगिरे, बाळासाहेब पाटील, शिव सेनेचे शहराध्यक्ष सलीम शेख, आयुब शेख , इकबाल मुल्ला, विक्रांत संगशेट्टी, दिपक रोडगे, विकी भाऊ मोरे, नितीन रोडगे, जयसिंग बंडगर , रघुविर घोडके तसेच तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना रंजनाताई हासुरे म्हणाल्या अहिल्यामाईंनी पती निधनानंतर सती न जाता किंवा वैराग्य न पत्करता हातामध्ये ढाल व तलवार घेऊन रयतेचे रक्षण केले तसेच लोक माता म्हणून 28 वर्षे उत्तम प्रशासक म्हणून राज्यकारभार पाहिला परंतु हा दैदिप्यमान इतिहास आमच्या स्त्रियांपासून लपवून ठेवून केवळ हातामध्ये महादेवाची पिंडी धरून वैराग्य पत्करलेल्या प्रतिमेमध्ये अहिल्यामाईंना आमच्या समोर ठेवण्यात आले. परंतु मराठा सेवा संघाने प्रथमता अहिल्यामाईंची हातामध्ये ढाल तलवार व घोड्यावर अरुढ असलेली प्रेरणादायी प्रतिमा जगासमोर आणली.
 
Top