Views*कृषी दिनानिमित्त हिपरगा (रवा) येथे शेतीशाळा*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

लोहारा तालुक्यातील हिपरगा (रवा) येथे तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांच्या मार्गदर्शनाखाली दि.1 जुलै 2021रोजी खरीप हंगामातील शेतीशाळा कृषी दिनाच्या निमित्ताने घेण्यात आली. यामध्ये शेतकऱ्यांना निंबोळी अर्क कसा तयार करावा व त्याचे फायदे काय आहेत, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शेतीशाळा प्रशिक्षक स्नेहल पाटील, सरपंच राम मोरे, अनिल मोरे, सारंग घाटे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
 
Top