Views




*बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून गायकवाड परिवाराकडून रुग्ण व नातेवाईकांना अन्नदान*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

 उमरगा तालुक्यातील मुरुम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याजवळील कोविड सेंटरमध्ये अलका गायकवाड यांच्या परिवाराकडून रुग्ण व नातेवाईकांना बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून अन्नदान करण्यात आले. मुरुम येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेतील सहशिक्षिका अलका गायकवाड यांनी कोविड सेंटरमध्ये जावून रुग्ण व नातेवाईकांना दुपारचे पोष्टीक जेवण देवून खऱ्या अर्थाने माणुसकी जोपासली. त्यांनी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धांचे विचार खऱ्या अर्थाने अंगिकारले. या निमित्ताने सेंटरमध्ये अहोरात्र काम करणारे डॉ.एम.जी.मुल्ला, अबोली कांबळे, महादेव घंटे, पुनम घंटे, प्रसन्न कांबळे आदी कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार मुरूम काँग्रेसचे शहराध्यक्ष सुधीर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. बाळासाहेब वाघमारे, अलका गायकवाड, कुमारी मेघना कांबळे आदींनी पुढाकार घेऊन अन्नदान केले. सध्याची गरज ओळखून, सामाजिक बांधिलकीचे भाव ठेवून गायकवाड परिवाराने केलेल्या अन्नदानाचे परिसरात कौतुक होत आहे.
 
Top