Views


*जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा वंदना भगत लोहारा यांचा बहुजन रयत परिषदेच्या वतीने सन्मान*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

उस्मानाबाद जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या लोहारा येथील वंदना भगत यांचा बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित सावित्रीच्या लेकींचा सन्मान सोहळा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दि.20 मार्च 2021 रोजी सावित्रीच्या लेकी विशेषांक प्रकाशन व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजन करण्यात आला होता. या कार्यक्रमात जिजाऊ ब्रिगेडच्या उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षा तथा महिला दक्षता समितीच्या सदस्या वंदना भगत, महिला राजसत्ता आंदोलनाच्या जिल्हाध्यक्षा विद्याताई वाघ, बाबई चव्हाण, डॉ.अनिता मुदकण्णा, डॉ. जयश्री घोडके यांच्यासह अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे होत्या. यावेळी प्रमुख म्हणून अणदूरचे सरपंच रामचंद्र आलूरे, पुणे येथील उद्योजिका अनिता गालफाडे, बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्षा ऍड.कोमल साळुंके, प्रदेश कार्याध्यक्ष रमेश गालफाडे, जि.प.चे माजी अध्यक्ष शिवदास कांबळे, भूमिपुत्र वाघ, आदि, उपस्थित होते. या कार्यक्रमात सावित्रीच्या लेकी या विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन दयानंद काळुंके, प्रकाश गायकवाड यांनी केले होते.
 
Top