Views


*चोरीची एक पिकअप व एक दुचाकी सह दोन आरोपी जेरबंद*

*धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही*

धाराशिव/प्रतिनिधी 


वाहनांची चोरी करणाऱ्या दोन जणांना बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातुन दोघांना धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून एक पीकअप वाहन व एक दुचाकी जप्त केली 

धाराशिव जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते. यावेळी पथकाला गुप्त बातमी मिळाली की बेंबळी पोलीस ठाणे व तुळजापूर पोलीस ठाणे येथे दाखल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हे बीड जिल्ह्यातील केज शहरात असल्याचे माहिती मिळाली त्यांच्या जवळ चोरीची वाहने असल्याचे माहिती मिळाली या माहितीवरून पथकाने केज येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला असता त्यावेळी संशयित दोन आरोपी पथकाला पाहता पळून जात असताना नय्युम शब्बीर शेख व प्रितम मोहनराव चव्हाण दोघे रा केज जि बीड या दोघांना पथकाना ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांनी प्रथमतः पोलिसांना उडवा उडवीची उत्तरे दिली पोलिसांनी विश्वासात घेत त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी इतर दोन मित्रां सोबत मिळून गेल्या काही दिवसात तुळजापूर येथून एक अशोक लेलँड दोस्त कंपनी चा पिकअप व बेंबळी येथून एक काळ्या रंगाचे होंडा शाइन मोटरसायकल ची चोरी केली असल्याचे कबूल दिली 

संबंधित आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जप्त केले आरोपींना चोरीच्या तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले

सदर कार्यवाही ही 
धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी ,अप्पर पोलीस अधीक्षक गैहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, शौकत पठाण, जावेद काजी, प्रकाश औताडे , फरहान पठाण, चालक रत्नदीप डोंगरे यांनी केली 
 
Top