Views


*मतदार जनजागृती कार्यक्रम*

*विद्यार्थ्यांनी साकारली मानवी साखळी*

*घरातील सर्व पात्र व्यक्तींनी 7 मे रोजी मतदान करावे-- डॉ. सचिन ओंबासे*

* शहरातील 32 शाळा महाविद्यालयांचा सहभाग*
* राजकुमार कुंभारने साकारली रांगोळी*




धाराशिव/प्रतिनिधी 


 


 येत्या 7 मे रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदान व्हावे, यासाठी मतदानास पात्र असलेल्या घरातील सर्व व्यक्तींनी मतदान करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने 40- उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढविण्याबाबत मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन श्री.तुळजाभवानी स्टेडियम येथे आज 24 एप्रिल रोजी मतदार जनजागृती कक्षाच्या वतीने करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.ओंबासे बोलत होते.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष,सहायक जिल्हाधिकारी प्रियंवदा म्हाडदाळकर,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

रांगोळी कलाकार राजकुमार कुंभार यांनी मतदार जागृतीचे निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह असलेली भव्य रांगोळी काढली.रांगोळीच्या बाजूला विद्यार्थ्यांनी हातात हात घेऊन मानवी साखळी साकारून मतदान जागृतीचा संदेश दिला.यावेळी शिक्षक उदय पाटील यांचा हसमुखराय बोलका बाहुल्याने मतदानाविषयी मनोगत व्यक्त करून मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. 

जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांनी हवेत तिरंगी फुगे सोडून मानवी साखळीचे उद्घाटन केले.यावेळी उपस्थितांना मतदानाची प्रतिज्ञा देण्यात आली. मान्यवरांचे स्वागत भारतीय संविधान पुस्तक देऊन करण्यात आले.

धाराशिव शहरातील 32 शाळा महाविद्यालयाचे 2000 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते.या विद्यार्थी,विद्यार्थीनींनी मतदार जनजागृती कार्यक्रमातंर्ग मानवी साखळी साकार करुन मतदार जनजागृती केली.पोदार इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

मतदार जनजागृतीच्या या कार्यक्रमाला धाराशिव शहरातील श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,रामकृष्ण परमहंस उच्च माध्यमिक विद्यालय,शम्युल उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,आर्य चाणक्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, तेरणा उच्च माध्यमिक विद्यालय, अल्लामा सिद्दीक उर्दू हायस्कूल,तेरणा हायस्कूल,धाराशिव प्रशाला,पोद्दार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल,श्री.श्री. रविशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,भाई उद्धवराव पाटील प्रशाला,साराह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,भगीरथाबाई लाटे हायस्कूल,नवीन माध्यमिक विद्यालय,समता माध्यमिक विद्यालय, शरद पवार माध्यमिक विद्यालय, ग्रीनलँड इंग्लिश मीडियम स्कूल, अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल, धीरूभाई अंबानी माध्यमिक विद्यालय,जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय, सत्यभामा शिंदे माध्यमिक विद्यालय,भारत विद्यालय,शिवाजी विद्यालय,डॉ.चंद्रभान सोनवणे उच्च माध्यमिक विद्यालय,बिल गेट्स उच्च माध्यमिक विद्यालय,जिल्हा परिषद कन्या शाळा,विद्यामाता इंग्लिश स्कूल, आसरा उर्दू हायस्कूल,मौलाना आझाद उर्दू हायस्कूल व तेरणा पब्लिक स्कूलचे 2000 विद्यार्थी सहभागी झाले होते.

या कार्यक्रमाला संबंधित शाळा,महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व प्राचार्य तसेच शिक्षक व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक विशाल सूर्यवंशी यांनी मानले.तुळजाभवानी स्टेडियम येथून निघालेली रॅली शहरातील मुख्यमार्गाने मार्गक्रमण करीत मतदान जनजागृतीचा संदेश देत सहभागी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या.

 
Top