Views
*गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा मागणी साठी व महाविकास (वसुली) आघाडीच्या सरकारच्या विरोधात भाजपाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला

गृहमंत्री अनिल देशमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनामा मागणी साठी व महाविकास (वसुली) आघाडीच्या सरकारच्या विरोधात उस्मानाबाद जिल्हा भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.21 मार्च 2021 रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी भाजपाच्या वतीने ग्रहमंत्री अनिल देशमुख व महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात निषेध घोषणा देऊन राजीनाम्याची मागणी करण्यात आली. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजपा बुद्धिजीवी प्रकोष्ठ तथा माजी जिल्हाध्यक्ष लातूर शहर प्रभारी दत्ताभाऊ कुलकर्णी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड.खंडेराव चौरे, भाजपा जिल्हा सरचिटणीस ऍड.नितीन भोसले, प्रदीप शिंदे, भा.ज.यु.मो.जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेंनिंबाळकर, शहराध्यक्ष राहुल काकडे, सुजित साळुंके, बालाजी कोरे, प्रवीण पाठक, नामदेव नायकल, संतोष क्षीरसागर, सूरज शेरकर, गणेश इंगळगी, प्रसाद मुंडे, अक्षय भालेराव, श्रीराम मुंबरे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
 
Top