Views


*घरफोडीतील मुद्देमालासह एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात*

*अवघे चोवीस तासात धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या टीम ने केली कार्यवाही*

धाराशिव/ प्रतिनिधी 

धाराशिव तालुक्यातील आंबेजवळगे येथील आनंद क्षीरसागर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने दरवाजा तोडून बुधवार (दि 03) रोजी रात्री 12.30 ते 05.30 वाजण्याचे दरम्यान त्यांचे घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातील एक टीव्ही साऊंड होम थेटर व इतर मुद्देमाल असा एकूण 68,000 रुपयाचा चोरून नेहले अशी फिर्याद आनंद क्षीरसागर यांचे मित्र महादेव बाळू ननवरे यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात 
  गुन्हा दाखल झाला. त्याअनुषंगाने धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे टिमने तपास चक्र फिरवून गुरुवार(दि.04) रोजी सांजा भागातून आरोपी अजय श्रावण शिंदे रा.सुंभा यास पकडून त्याचे कडून गुन्ह्यातील मुद्देमाल पैकी एक टी.व्ही व होम थेटर जप्त केला असून उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरु असून आरोपी अटक करण्यात आल आहे.उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई सुरु असून आरोपी अटक करण्यात आल आहे.

सरद कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारूती शेळके यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उपनिरीक्षक बनसोडे, पोलिस हवालदार वाहेद मुल्ला, भीमराव ढगे, महिला पोलिस हवालदार ज्योती गिरी, पोलिस नाईक लियाकत पठाण, बाबा शेख शंकर तलवारे,आदीने केली अवघ्या चोवीस तासात कार्यवाही केल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे 







 
Top