Views


*हरवलेला अल्पवयीन बालकास कोल्हापूर येथून शोधण्यास धाराशिव ग्रामीण पोलिस ना यश..*


धाराशिव/ प्रतिनिधी



धाराशिव तालुक्यातील वरवंटी या गावातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा शुक्रवार (दि 05 )रोजी कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता, मुलाच्या वडिलांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात आपला मुलगा हरवला असल्याची लेखी तक्रार नोंदवली होती त्यांनी सांगितलेल्या मुलांच्या मोबाईल लोकेशन वरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुर्यकांत माळी यांनी हरवलेल्या अल्पवयीन मुलास कोल्हापूर बसस्थानकावरून शोधून त्यांच्या जवळून लॅपटॉप व मोबाईल फोन सह मिळून आला असून त्याला तात्पुरते त्याचे वडिलाचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी, अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उप विभागीय पोलिस अधिकारी श्री स्वप्नील राठोड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मारुती शेळके, यांच्या नेतृत्वाखालील पोलिस हेड कॉन्स्टेबल सुर्यकांत माळी, राजू माचेवाड यांनी केली आहे.


 
Top