Views


*लोहारा तालुका ओबीसी कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस पदी भिमाशंकर डोकडे यांची निवड*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

लोहारा तालुका ओबीसी कर्मचारी संघटनेच्या सरचिटणीस पदी भिमाशंकर डोकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. लोहारा येथील लोहारा तालुका शिक्षक पतसंस्था कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सदस्य नोंदणी, पतसंस्थाच्या कॅलेंडर बाबत अर्थ सहाय्य, विविध पदे भरणे यासह इतरही विषयावर चर्चा झाली. याच बैठकीत लोहारा तालुका ओबीसी कर्मचारी संघटना सरचिटणीस पदी भिमाशंकर डोकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी लोहारा तालुका शिक्षक पतसंस्था व्हाईस चेअरमनपदी सुर्यकांत पांढरे यांची बिनविरोध निवड झाल्यामुळे त्यांचा ओबीसी कर्मचारी संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या बैठकीस तालुकाध्यक्ष मच्छिंद्र बोकडे, कार्याध्यक्ष पंडीत राठोड, सचिव सतीश माळी, संपर्क प्रमुख डी.ए.पांचाळ, उपाध्यक्ष गजानन मक्तेदार, ओबीसी चे जिल्ह्याचे नेते दत्तात्रय पांचाळ, विकास घोडके, दत्तात्रय दंडगुले, आंबादास विरोधे, आनंत माळवदकर, दत्ता माळी, विश्वनाथ जट्टे, बब्रुवान शिंदे, महेश भोजने, अदि, उपस्थित होते.
 
Top