Views
*लोहारा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात शांततेत सुरळीत पार पडली*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत दि.22 जानेवारी 2021रोजी सकाळी 11 वाजता लोहारा तहसील कार्यालयात शांततेत सुरळीत पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी राजकुमार माने यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यावेळी तहसीलदार डॉ.रोहन काळे, नायब तहसीलदार दिगंबर स्वामी, पं.स.सभापती हेमलता रणखांब, गटविकास अधिकारी सोपान अकेले, उपस्थित होते. लोहारा तालुक्यातील कानेगाव सर्वसाधारण, भातागळी नागरिकांचा मागास प्रवर्ग, कास्ती (बु) अनुसुचित जमाती स्त्री, कास्ती (खुर्द) सर्वसाधारण, लोहारा (खुर्द) सर्वसाधारण, एकोंडी (लो) सर्व साधारण स्त्री, मुरशदपूर सर्वसाधारण, उदतपुर सर्वसाधारण स्त्री, चिंचोली (काटे) सर्वसाधारण स्त्री, मोघा बु सर्वसाधारण, बेलवाडी सर्वसाधारण, हराळी सर्वसाधारण स्त्री, कोंडजीगड नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, करवंजी अनुसूचित जाती स्त्री, हिप्परगा (सय्यद) सर्वसाधारण स्त्री, फणेपुर सर्वसाधारण स्त्री, भोसगा नागरिकांचा मागास प्रवर्ग, आष्टा (कासार) अनुसुचित जाती स्त्री, होळी सर्वसाधारण स्त्री, दस्तापुर नागरिकांचा मागास प्रवर्ग, करजगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, आरणी सर्व साधारण स्त्री, राजेगाव नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, धानुरी अनुसुचित जाती स्त्री, मार्डी नागरिकांचा मागास प्रवर्ग, तावशीगड सर्वसाधारण, जेवळी सर्वसाधारण स्त्री, विलासपुर पांढरी सर्वसाधारण, सालेगाव सर्व साधारण स्त्री, तोरंबा सर्वसाधारण, माळेगाव सर्वसाधारण, सास्तुर सर्वसाधारण स्त्री, चिंचोली रेबे सर्वसाधारण, माकणी सर्वसाधारण स्त्री, कास्ती खु सर्वसाधारण, बेंडकाळ नागरिकांचा मागास प्रवर्ग, वडगाव वाडी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागराळ लोहारा नागरिकांचा मागास प्रवर्ग, अचलेर नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, जेवळी दक्षिण नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, खेड अनुसुचित जाती स्त्री, वडगाव गां अनुसुचित जाती स्त्री, उंडरगाव अनुसुचित जाती स्त्री, हिप्परगा रवा अनुसुचित जाती स्त्री, नागुर अनुसुचित जाती स्त्री, या प्रवर्गासाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण सुटले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, शिवसेना तालुकाप्रमुख मोहन पणुरे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, यांच्यासह सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top