Views

*नागराळ लो वळण रस्त्यावरील धोकादायक पुलाच्या दोन्ही बाजुला संरक्षण कटाडे बांधण्यात यावेत, या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांचा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू*

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

लोहारा तालुक्यातील नागराळ लोहारा वळण रस्त्यावरील धोकादायक पुलास दोन्ही बाजुंनी संरक्षण कटडा नसल्याने छोटे, मोठे अपघात होत आहेत. तरी या पुलाचे संरक्षण कटाडे बांधण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नागराळ ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी जि.प.बांधकाम विभाग उमरगा व जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदन देवुनही दखल न घेतल्याने ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांनी लोहारा तहसील कार्यालयासमोर दि.21 जानेवारी 2021 पासुन बेमुदत आमरण उपोषास सुरूवात केली आहे. नागराळ लो उंडरगाव रस्त्यावरील पुल जि.प.बाधकाम उपविभाग उमरगा अंतर्गत कांही वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. त्यानंतर या पुलाकडे संबंधीत कार्यालयाकडुन देखभाल दुरुस्ती करण्यात आली नसल्याने या पुलाच्या दोन्ही बाजूचे संरक्षण कटाडे गळुन पडले आहेत. दि.13/10/2020 च्या मुसळधार पावसामध्ये पुलाचा कांही भाग ढासळुन गेला आहे. हा पुल रहदारीचा आहे. व तसेच हा पुल अरूंद असल्यामुळे छोटे, मोठे अपघात घडले आहेत. तरी याबाबत ग्रामस्थांनी जि.प.बांधकाम विभाग उमरगा व जिल्हाधिकारी यांना एक ते दोन वेळेस निवेदन देऊनही कार्यवाही झाली नसल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांनी बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या आमरण उपोषणास सरपंच सौ.रितु कुलदिप गोरे, उपसरपंच गुंडु जाधव, सदस्य तेजाबाई वाल्मिक कोळी, राजेंद्र कुंभार, ग्रामस्थ वाल्मिक कोळी, बसले आहेत.
 
Top