Views


*शेळका धानोरा येथून गावठी पिस्तूल जप्त तरूण पोलिसांच्या ताब्यात*

*स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही*
धाराशिव/ प्रतिनिधी

तालुक्यातील शेळका धानोरा येथे एक तरुण स्वतः त्याच्या घरी तो  देशी बनावटीचे पिस्तूल असल्याचे धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली त्याची गंभीर दखल घेत त्यास ताब्यात घेत त्याच्या कडून देशी बनावटीचे पिस्तूल व  पिस्तूल चे 3 राउंड जप्त करून त्यास अटक करून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला

याबाबत सविस्तर माहिती अशी की धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक हे मंगळवार (दि.01) रोजी संध्याकाळी कळंब तालुक्यातील फरारी आरोपीचा शोध घेत गस्त घालत असताना तालुक्यातील शेळका धानोरा येथे एक तरुण स्वतः च्या घरी देशी बनावटीचे पिस्तूल बाळगून असल्याची माहिती पथकाला मिळाली त्याची गंभीर दखल घेत पथक प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन कासार यांनी पथकासोबत शेळका धानोरा येथील शरद विठ्ठल पवार (वय 25 ) यास ताब्यात घेत त्याच्या कडे चौकशी केली असता त्यांनी स्वतः च्या घरी एक देशी बनावटीचे पिस्तूल व पिस्तूल चे 3 राउंड असल्याचे कबूल केले व पथकाने त्याच्या कडून पिस्तूल व  पिस्तूल चे 3 राउंड असे अंदाजे किंमत 25,900/- रुपयांचे मुद्देमाल जप्त यावर पथकाने त्यास अटक करून त्यांच्या विरोधात कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं 192/2024 हा शस्त्र कायदा -3/25 अन्वये नोंदवण्यात आला

सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वल्लीवुल्ला काझी, पोलिस हवालदार शौकत पठाण, जावेद काझी, फरहान पठाण, प्रकाश औताडे, शैला टेळे चालक पोकाॅ रत्नदीप डोंगरे यांनी केली 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top