Views








एकता फाऊंडेशन उस्मानाबाद चे शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

 समाजातील भावी पिढीवर संस्कार घडवण्यासाठी शिक्षक सतत प्रयत्नशील असतात आजवर अनेक सुजान नागरिक समाजाला देण्याचे काम शिक्षकाच्या माध्यमातुन झालेले आहे. त्यामागे शिक्षकांचे योगदान निश्चित प्रशंसनीय आहे हीच बाब ओळखुन शिक्षण क्षेञात निरपेक्ष वृत्तीने समर्पित भावनेतुन कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव व्हावा या हेतुने शिक्षकांचा सुसंस्कारीत पिढी घडवण्याचा ज्ञानयज्ञ अखंडपणे सुरु राहावा व त्यांच्या या प्रयत्नास बळ मिळावे या उद्देशाने एकता फाऊंडेशन उस्मानाबाद च्या वतीने दरवर्षी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार चे आयोजन करण्यात येते. पुरस्काराचे यावर्षी चे चौथे वर्ष आहे. 1) विक्रम माणिकराव पाटील जिल्हा परिषद कन्या प्रा. शाळा बेंबळी ता.उस्मानाबाद 2) संतोष काकासाहेब घार्गे श्रीपतराव भोसले माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद ता. उस्मानाबाद 3) धनंजय सदाशिव डोळस छञपती संभाजी विद्यालय जवळा ता. कळंब 4) प्रदीपकुमार अरुण गोरे नुतन प्राथमिक विद्यामंदीर उस्मानाबाद ता. उस्मानाबाद 5) भालचंद्र भारत कोकाटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवाजीनगर ता. उस्मानाबाद 6) सुशिलकुमार सुधाकर तीर्थकर विद्याभवन हायस्कुल कळंब ता. कळंब 7) श्रीमंत नारायण लगस जिल्हा परिषद शाळा वाडीबामणी ता. उस्मानाबाद. 8) सुधीर विश्वनाथ लोमटे जिल्हा परिषद प्रा. शाळा जवळा ता कळंब 9) श्रीमती.प्रणिता हरिश्चंद्र भंडारे छञपती शिवाजी माध्य व उच्च माध्य विद्यालय उस्मानाबाद ता. उस्मानाबाद 10) श्रीमती. सुनीता शंकरराव शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गौडगाव ता. उस्मानाबाद 11) संजय प्रभाकर देशमुख जिल्हा परिषद शाळा पळसवाडी ता. उस्मानाबाद 12) ज्ञानेश्वर गुरलिंगआप्पा माशाळकरभारत विद्यालय बेडगा ता. उमरगा 13) लक्ष्मण संभाजी शेळके न्यु हायस्कुल चिंचोली ता. भुम 14) अर्जुन चिंतामण जाधव जिल्हा परिषद कन्या शाळा कळंब ता. कळंब 15) श्रीमती. ज्योती दिलीप पाटील केंद्रीय प्राथमिक शाळा लोहारा ता. लोहारा 16) संघपाल पंडीत सुकाळे जिल्हा परिषद शाळा झिन्नर ता. वाशी 17) अनिल आभिमान शिंदे जिल्हा परिषद प्रा.शाळा हिंगणगाव ता. कळंब 18) तुकाराम विष्णु वाडकर जिल्हा परिषद प्रा. शाळा सांगवी काटी ता. तुळजापुर 19) श्रीमंत संदीपान चौरे जिल्हा परिषद प्रा. शाळा पाचपिंपळा ता परंडा 20) विठ्ठल उत्तम नरवडे जिल्हा परिषद प्रा. शाळा पिंपळा बुद्रक ता. तुळजापुर या शिक्षकांना यावर्षी चा आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर झाला असुन कोरोना महामारीचे संकट कमी झाल्यानंतर विविध क्षेञातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा यथोचित गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्था सचिव आभिलाष लोमटे यांनी दिली आहे. सर्व शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अमित कदम, विशाल थोरात, अतुल जगताप, प्रसाद देशमुख आदीनी आभिनंदन केले.
 
Top