Views


प्रथमेश अंबुरे यांचा आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

उस्मानाबाद:-(इकबाल मुल्ला)

परंडा शहरातील कल्याण सागर समूहातील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याण सागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी प्रथमेश प्रदिप अंबुरे यांची टाटा कन्सल्टिंग रिसर्च सेंटर पुणे येथे संशोधक पदी निवड झाल्याबद्दल शहरातील संपर्क कार्यालयात कल्याण सागर समूहाचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथमेश अंबुरे कल्याण सागर समूहातील सरस्वती प्राथमिक शाळेत इ 1 ली ते 7 वी 8 वी ते 10 वी पर्यंतच्या कल्याण सागर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी होता.

 
Top