Views


भूम येथे महाराष्ट्र मुस्लिम फृंट च्या वतीने कोरोना योद्धा सन्मानपत्र वाटप.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

  भुम तालुक्यातील शहरांमध्ये व ग्रामीण भागामध्ये कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर विविध जाती धर्मातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत असताना महाराष्ट्र राज्य मुस्लिम फ्रंट या सामाजिक संघटनेने विविध घटकातील 
   सामाजिक कार्यकर्त्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करुन समाजाची ज्यांनी अहोरात्र कोरोना काळात सेवा केली आहे व करत आहे अशा कोरोना योद्धयांना त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करत प्रोत्साहन दिले व प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले 
        यावेळी महाराष्ट्र मुस्लिम फृंटचे संस्थापक अध्यक्ष नदीम भाई मुजावर मराठवाडा अध्यक्ष असिफ जमादार टिपू सुलतान ग्रुप अध्यक्ष फिरोज शेख उपस्थित होते.कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आलेले पत्रकार गौस शेख औदुंबर जाधव विलास शाळु सेवादल काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रल्हाद अडागळे रविंद्र लोमटे सोपान वरवडे शेख रहीम चाचा आज्जु भाई जमादार  आमजद मोगल विठ्ठल बाराते राजु  पठाण तोफीक पठाण  आसलम बागवान नदीम शेख  सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश साळवे सहाय्यक  पोलिस निरीक्षक राजेश गडवे पोलिस खोत सर  चौंडेश्वरी मंडळ भूम यांना सन्मानित करण्यात आले

 
Top