Views


उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर तालुक्यात  चार रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

उस्मानाबाद जिल्ह्यातील  चार रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह आढळले. ते चारही पाॅझिटिव्ह पेशंट तुळजापुर तालुक्यातील आहेत.गुरुवार ( दि. 25).रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 46 swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून चार पॉसिटीव्ह, तीन  inconclusive व 39 नेगेटिव्ह असा आहे. 

पॉसिटीव्ह पेशंट ची माहिती. 
दोन   पेशंट सलगरा (दि )येथील असून पूर्वीच्या पॉसिटीव्ह पेशंट च्या संपर्कातील आहेत .  तिसरा पेशंट   हंगरगा ता तुळजापूर  येथील  आहे. व चौथा पेशंट वानेगाव ता तुळजापूर येथील आहे.  सर्व पेशंट तुळजापूर तालुक्यातील आहेत. 
काल औंढा ता निलंगा. जि. लातूर येथील एक पेशंट उमरगा येथे पॉझिटीव्ह आला होता तो आज लातूर जिल्ह्यात वर्ग झाला आहे.

Total cases 194
Discharge    144
Death               09
Active patient 41.


 
Top