Views


*वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचा उस्मानाबाद जिल्हा दौरा*

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

 राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. अमित विलासराव देशमुख हे दिनांक 26 जून 2020 रोजी उस्मानाबाद जिल्हा दौ-यावर येत असून त्यांच्या दौ-याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
  शुक्रवार, दिनांक 26 जून 2020 रोजी सकाळी 9.30 वाजता बाभळगाव येथून उस्मानाबाद कडे प्रयाण. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे उस्मानाबाद जिल्हा covid-19 च्या अनुषंगाने आढावा बैठक( जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व नगरपालिकांचे मुख्याधिकारी उपस्थित राहतील). दुपारी 12.00 वाजता डीपीडीसी हॉल येथे पत्रकार परिषद घेतील. दुपारी 1.00 ते 2.00 वाजेपर्यंत राखीव. दुपारी 2.00 वाजता उस्मानाबाद येथून आंबेजोगाई कडे प्रयाण.

 
Top