Views
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शहीद सुनिल काळे  यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून कुटुंबाचे सांत्वन केले. 

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

बार्शी तालुक्यातील पानगाव गावचे सुपुत्र जवान सुनिल दत्तात्रय काळे हे पुलवामा येथे कर्तव्यावर असताना शहीद झाले. ही बाब त्यांच्या कुटुंबीयांसह संपुर्ण देशासाठी दुःखदायक आहे.
     आज पानगाव(बार्शी) या जन्मगावी त्यांच्यावर अंतिम संस्कार झाले. यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित राहून त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले व कुटुंबीयांचे सांत्वन केले.
 
Top