*जुगार अड्डा वर धाड 11 जुगारी ताब्यात घेऊन 4,99,060/- रुपयांचा मुद्देमाल जप्त*
कळंब/ प्रतिनिधी
शहरा लगत असलेल्या डिकसळ येथे शेता मध्ये पत्र्याच्या शेडमध्ये तिरट जुगार अड्डयावर कळंब पोलिसांनी छापा मारत 10 जुगारी ताब्यात घेत त्यांच्या कडून 4,99,060- रूपयाचे मुद्देमाल हस्तगत केले
कळंब शहरा लगत डिकसळ येथे मोहेकर महाविद्यालयाच्या पाठी मागे बोराडे यांच्या शेतात पत्र्याच्या शेडमध्ये तिरट नावाचे जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांना रविवारी (दि.29) रोजी मिळाली यांची दखल घेत तत्काळ सदर ठिकाणी छापा मारून तिरट नावाचे जुगार खेळत असलेले1.राहुल मधुकर माने, 2.मनोज बाबुराव कानडे, 3.जलील जिलानी शेख,4.ताहेर युसुफ शेख , 5.दिनेश राजाभाऊ कोलगंडे, सर्व रा. कळंब,6.अनंत बापू कांबळे रा. येरमाळा, 7.सुरज संभाजी वैरागे रा. सादोळा ता. केज जि. बीड, 8.विष्णू पंढरीनाथ घुले रा. टाकळी ता.केज जि बीड, 9.बापू फैजू काळे रा. कळंब,10.सलीम कादर शेख रा. ढोकी ता जि उस्मानाबाद तसेच जुगार अड्डा चालवणारा बोराडे रा. डिकसळ ता कळंब जि उस्मानाबाद यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून रोख रक्कम 14,060/- रूपये 7 मोबाईल अंदाजे किंमत 80,000/- रुपये 6 मोटार सायकल अंदाजे किंमत 40,5000/- रुपये असे एकूण 4,99,060/- रूपयाचे मुद्देमाल जप्त केला
सदर कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी एम रमेश यांच्या नेतृत्वाखालील पोलिस उपनिरीक्षक जी.पी. पुजरवाड पोहेकाॅ राऊत, पोलिस नाईक सादेक शेख, खांडेकर,भांगे, मंदे, राऊत, अंभोरे यांनी केली सदर कार्यवाही दरम्यान पोलिसांना दोन अडीच किलोमीटर पाठलाग करावा लागला या कार्यवाही ने अवैध माफिया मध्ये दहशत निर्माण झाली आहे