*महर्षी वाल्मिकी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा*
धाराशिव/ प्रतिनिधी
महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गुरुवार (दि.17) रोजी धाराशिव शहरातील जिजाऊ चौक बार्शी नाका येथे महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन हे धाराशिव कळंब मतदार संघाचे आमदार कैलास पाटील व मनिषाताई केंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर दुध वाटत करण्यात आले तसेच सायंकाळी वारकरी संप्रदाय दिंडी मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक धाराशिव शहरातील जिजाऊ चौक येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक असे काढण्यात आली तस मनीषाताई केंद्रे यांच्या हस्ते जिजाऊ चौक येथे दुध वाटप करण्यात आले त्यानंतर सायंकाळी समाप्ती नंतर महाप्रसादाचे आयोजन श्री अमृततुल्य चे मालक श्री नागनाथ खंडेराव यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम हे जयंती महोत्सवाचे अध्यक्ष रविराज खंडेराव, उपाध्यक्ष रवी यादव सचिव सुनील घंटे, अभिराम पाटील, प्रसाद पाटील, व्यंकटेश दिवाणे आदींनी परिश्रम घेतले