Views


*“पवनचक्कीचे कॉपर वायर चोरी करणारे चार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.”*

धाराशिव/प्रतिनिधी 


वाशी तालुक्यातील अंजनसोडा शिवारा येथे उत्तम एंटर प्रायझेस कंपनी चे आर ई 4 ही पवनचक्की बसवण्याचे काम करत आहे उत्तम एंटर प्रायझेस कंपनी चे आर ई 4 पाॅंईटवरील टाॅवरमधील काॅपर चे तार बुधवार (दि 24) रोजी अज्ञात व्यक्तीने चोरून नेहली असल्याचे वाशी पोलीस ठाण्यात महेश महादेव माळी यांनी तक्रार दिली माळी यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरांन विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता 

गुन्हा तपासादरम्यान धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व तांत्रिक विश्लेषनावरुन तानाजी उर्फ चिक्या आसाराम काळेपारा पारधी पिढी, ता. वाशी , जिवन उर्फ दत्तात्रय अच्युत क्षिरसागर,अंजनसोंडा ता. वाशी ,आकाश विष्णु खराटे,भोगजी ता. कळंब जि. धाराशिव , उत्तरेश्वर महादेव दराडे,सारोळा मांडवा ता. वाशी जि. धाराशिव 
  गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही दिवसात वरील ‍ठिकाणावरून ताब्यात घेउन त्यांच्या कडे गुन्ह्या संदर्भात चौकशी केली असता नमुद आरोपींनी आम्ही व आमचे अन्य साथीदारांनी केबल वायर चोरी केल्याची कबुली दिली. यावरुन पथकाने नमुद आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप व मोबाईल फोन असे अंदाजे 5,15,000/- रूपयांचे मुद्देमाल जप्त करुन पुढील कार्यवाहिस्तव नमूद आरोपींना वाशी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.

           सदर कार्यवाही ही धाराशिव पोलीस अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधीक्षक शगौहर हसन. यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वलीउल्ला काझी, पोलिस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे ,जावेद काझी, फरहान पठाण, यांच्या पथकाने केली 




 
Top