Views


*व्हॉईस ऑफ मीडियाची महाराष्ट्र राज्य पत्रकार पाल्यांसाठी शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना.*

*महारष्ट्र राज्य अध्यक्ष पदी श्री चेतन कात्रे*



 कळंब/प्रतिनिधी 

 उस्मानाबाद येथे दिनांक 26 जानेवारी रोजी पत्रकार कार्यशाळा, जीवन विमा पॉलिसी, ओळखपत्र वाटप असा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमा वेळी व्हॉईस ऑफ मीडिया चे संस्थापक अध्यक्ष श्री. संदीपजी काळे साहेब यांनी व्हॉईस ऑफ मीडिया च्या कार्यद्धतीबाबत सविस्तर माहिती दिली. त्याच बरोबर सकारात्मक बातमीसाठी 2.50 लाख रुपयांच्या पुरस्काराची तसेच महाराष्ट्रातील कुठल्याही पत्रकाराच्या पाल्यांच्या शैक्षणिक मदत कक्षाची स्थापना करण्यात आली. यावेळी उपस्थित पत्रकारांमध्ये आनंदी वातावरण तयार झाले होते. यासाठी 11 सदस्यांची निवड करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या शैक्षणिक मदत कक्षाच्या अध्यक्ष पदी श्री चेतन कात्रे कळंब जिल्हा उस्मानाबाद यांची नियुक्ती करण्यात आली. यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले.
*चेतन कात्रे (महाराष्ट्र राज्य पत्रकार कुटुंब शिक्षण समिती अध्यक्ष)-*
चेतन कात्रे माध्यमांशी व पत्रकार बंधवांशी बोलताना सविस्त्रत असे म्हणले की, महाराष्ट्रातील कुठल्याही पत्रकाराच्या कुटुंबातील पाल्यांच्या शैक्षणिक प्रक्रियेस किंवा मदतीस व्हॉईस ऑफ मीडिया सदैव तत्पर राहील. आजपासूनच त्यांनी कार्यास सुरुवात केली ते महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकार बांधवांशी शक्य होईल तेवढे समक्ष, फोन कॉल, किंवा सोशियाल मीडिया माध्यमातून संपर्क साधून त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक बाबतीत विचारपूस करून मदत करणार असल्याचे सांगितले.

 
Top