Views





*अत्यंत निष्ठापूर्वक व जबाबदारीने काम केले-डॉ.अशोकराव मोहेकर*




कळंब/प्रतिनिधी 
वरिष्ठ महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ.थोरात लंकेश्वर मारुती व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. लटंगे राजेंद्र प्रभाकर यांच्या सेवा निवृत्ती निमित्त आयोजित समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांनी आपल्या सेवेत तीन साडेतीन दशकाच्या काळात दोघांनीही अत्यंत निष्ठेने व जबाबदारीने काम केल्याचे गौरवपूर्ण उद्गार काढले. यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी वेळोवेळी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव केला. सुरुवातीच्या काळात महाविद्यालयाला पुढे नेण्याचे मोठे काम या दोघांनीही केले. त्यामुळे त्यांची सेवा निश्चित महत्वपूर्ण ठरते.
याप्रसंगी माजी विद्यार्थिनी धनश्री कवडे, उप प्राचार्य प्रा. पंडित पवार, रोहिणी थोरात श्रीपाद , लटंगे मॅडम, प्रा.विलास, प्रा. मगकरवाड सर यांनी मनोगत व्यक्त केले. दोन्ही सत्कारमूर्तीने संस्थेविषयी आनंद व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उप प्राचार्य हेमंत भगवान डॉ सतीश लोमटे , प्रा.अंजली मोहेकर तसेच सत्कारमूर्तीचे कुटुंबीय, नातेवाईक महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.दादाराव गुंडरे.आभार प्रदर्शन प्रा.जे.एच. काझी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अरविंद शिंदे, श्री हनुमंत जाधव, श्री.पी. एल. गायकवाड ,श्री.संदीप सूर्यवंशी आदींनी परिश्रम घेतले.




 
Top