Views


*40 हजार रुपये घेताना भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक अधिकारी ताब्यात*

कळंब/ प्रतिनिधी


कळंब येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भूमापक कर्मचारी यास 40 हजार रुपये घेताना उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या पथकाने कार्यालयात परिसरात सापळा रचून रंगेहाथ पकडले

   तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेले जमिनीची मोजणी करून लवकरात लवकर हद्द कायम करून नकाशा देण्यासाठी आरोपी लोकसेवक प्रशांत अरुणकुमार खरात ,वय 36 वर्षे पद :- भुमापक, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, कळंब, ज़ि. उस्मानाबाद (वर्ग-3) यांनी 50 हजार रुपयाची लाचेची मागणी करून तडजोड करून तक्रारदार यांच्या कडून 40 हजार रुपये स्वीकारले असता उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयात परिसरात सापळा रचून रंगेहाथ पकडले 


 सदर कार्यवाही ही मा. डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.औरंगाबाद.मा.विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. औरंगाबाद.मा. प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि.यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी :- विकास राठोड, पोलीस निरीक्षक,ला.प्र. वि. उस्मानाबाद ,पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे , सचिन शेवाळे, विशाल डोके,चालक दत्तात्रय करडे यांनी केली *उस्मानाबाद जिल्ह्यातील कोणी लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा*


प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 9527943100

श्री अशोक हुलगे,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं.8652433397

विकास राठोड,पोलीस निरीक्षक,
ला.प्र. वि. उस्मानाबाद
मो.नं. 7719058567
कार्यालय 02472 222879
 
Top