Views

*फटाके विक्री स्टॉलच्या परवानगीची* 
*29 ऑक्टोंबर पर्यंत मुदत*

उस्मानाबाद/प्रतिनिधी

जिल्हयातील दिपावली सणानिर्मित्त प्रतीवर्षाप्रमाणे तात्पुरते फटाके विक्री स्टॉल परवानगी मिळविण्यासाठी दि.18 ते 29 ऑक्टोंबर दरम्यान येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत.असेही अपर जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.
या परवानगीसाठी विहित नमुन्यातील अर्ज,फार्म LE-5,ओळखपत्र,संबंधित ग्रामपंचायत,नगर परिषदे,नगर पंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र आणि साक्षांकित नकाशा संबंधित जागा खाजगी असेल तर जागा मालकाचे नाहरकत आणि जागेचे कागदपत्र संबंधित पोलीस स्टेशनचे नाहरकत प्रमाणपत्र आणि विहित परवाना फीस भरणा केल्याचे चालन सादर करावे.परिपूर्ण असलेले प्रस्ताव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्वीकारले जातील.विहित दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
                           

 
Top