Views


*जेवळी येथील डॉ.कल्याणी अशोक भुसने यांची श्री हिंगुलांबिका आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज गुलबर्गा येथे प्राध्यापक (प्रोफेसर) व हेड ऑफ डिपार्टमेंटपदी पदोन्नती*

उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
    
लोहारा तालुक्यातील जेवळी येथील डॉ.कल्याणी अशोक भुसने यांची श्री हिंगुलांबिका आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज गुलबर्गा येथे प्राध्यापक (प्रोफेसर) तसेच हेड ऑफ डिपार्टमेंटपदी पदोन्नती झाली आहे. या अगोदर डॉ. कल्याणी भुसने पाच वर्ष शिक्षक व पाच वर्ष सहाय्यक प्राध्यापक म्हणून बेंगलोर, मेंगलोर, गुलबर्गा येथे काम केले आहेत. याचबरोबर विविध एमबीबीएस बीडीएस कॉलेजमध्ये चिफ स्क्वॉड म्हणून सुद्धा अनुभव आहे. डॉ भुसने यांचे एमडी शिक्षण गव्हर्मेंट आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मैसूर येथे झाले आहे. एमडी एंट्रन्स परीक्षेमध्ये संपूर्ण भारतातून ते प्रथम आले होते. सोलापूर येथील प्रकृती आयुर्वेदिक पंचकर्म सेंटर चे संस्थापक अध्यक्ष ही आहेत. आठवड्यातून दोन दिवस ते सोलापूर मध्ये असतात. किडनी विकार, त्वचारोग, सांध्याचे व मणक्याचे आजार, पोटाचे विकार, जुनाट सर्दी, उंची कमी असणे या आजारावर शुद्ध आयुर्वेदिक चिकित्सा देतात. याचबरोबर विविध वर्तमानपत्रांमध्ये आरोग्यविषयक लेखही प्रसिद्ध झाले आहेत.
 
Top