*श्री सिध्दीविनायक अग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड देवकुरुळी ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद चा रोलर पूजन सोहळा उत्साहात संपन्न*
उस्मानाबाद/इकबाल मुल्ला
श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड देवकुरुळी ता.तुळजापूर येथील कारखान्याचा मिल रोलर पूजनाचा समारंभ दि.10 सप्टेंबर 2021 रोजी उत्साहात संपन्न झाला. सदरचा कार्यक्रम श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये व जिल्हा परिषद सदस्य वसंत वडगावे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड.अनिल काळे व जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.नितीन भोसले यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तुळजापूर नगरीचे नगराध्यक्ष सचिन भाऊ रोचकरी, श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट चे अध्यक्ष व्यंकटेश कोरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, तुळजापूर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, आनंद कंदले, विशाल रोचकरी, प्रभाकर मुळे, सत्यवान सुरवसे, साहेबराव घुगे, दत्ता राजमाने, प.स.सदस्य चित्तरंजन सरडे, प.स.सदस्य शिवाजी साठे, प.स.सदस्य पिंटू कळसुरे, नांदुरी सरपंच मोहन मुळे, उपसरपंच हनुमंत जाधव, देवकुरुळीचे सरपंच राहुल कलाटे, अनिल जाधव, नागेश चौगुले, बाबा बेटकर, शिवाजी शिंदे, विजय रोकडे, आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमास श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड चे कर्मचारी व सिध्दीविनायक परिवाराचे हितचिंतक व परिसरातील शेतकरी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी कारखान्याच्या जडणघडणीचा लेखाजोखा मांडला व तुळजापूर तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांची निकड लक्षात घेऊन या भागात कारखाना उभारण्याचा संकल्प केल्याचे सांगितले व ऑक्टोबर महिन्यात मोळी पूजनाचा कार्यक्रम घेण्याचा निश्चय व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. प्रतीक देवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालाजी शिंदे यांनी व्यक्त केले.