*महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या ४थ्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करत असल्यामुळे अनिल हजारे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले*
धाराशिव /प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस टाईम्स च्या 4थ्या वर्धापनदिनाचे आयोजन धाराशिव येथे करण्यात आले होते या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन दिप प्रज्वलन व भारतमातेच्या प्रतीमेचे पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनीय काम केल्यामुळे पत्रकारितेत उत्कृष्ट काम तसेच न्यायालयात उत्तम वकीली केलेले अशा अनेक मान्यवरांचा महाराष्ट्र पोलीस टाईम्स च्या वर्धापनदिनी पुरस्कार देण्यात आले यावेळी सामाजिक कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीत सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कामगिरी काम करत असल्यामुळे रिपब्लिकन सेनेचे धाराशिव माजी जिल्हा अध्यक्ष वंचित बहूजन आघाडी धाराशीव जिल्हा नेते अनिल हजारे यांना महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मानचिन्ह पुष्प गुच्छ तसेच शाल श्रीफळ देऊन राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक जिल्हा पोलीस उप अधिक्षक स्वप्नील पाटील साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र पोलीस टाइम्स मुख्य संपादक उमेश काळे साहेब हे होते यावेळी प्रमुख उपस्थितीत पोपटराव पाटील सेवानिवृत्त आर टी ओ साहेब, धाराशिव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शेख साहेब प्रगतशील शेतकरी दिपक घोडके जेष्ठ पत्रकार समाजसेवक राजेंद्र स्वामी,सरकारी वकील कोरे साहेब, उपसंपादक प्रदिप नाना मगर तुळजापूर तालुका प्रतिनिधी संतोष दुधभाते,आर एस गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी व महाराष्ट्र पोलीस टाईम्स वर प्रेम करणारे हजारो लोक यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मगर यांनी केले आभार गायकवाड यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस टाईम्स चे सर्व प्रतिनिधी यांनी सहकार्य केले